Maharashtra Zilla Parihshad Recruitment

Maharashtra Zilla Parihshad Recruitment 2023 | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३

Maharashtra Zilla Parihshad Recruitment 2023 : Zilla Parishad is going to conduct the post of including Data Entry Operators, Health Supervisors, Health Sevaks (Male/Female), Pharmacists, Engineers, Draftsmen, Assistants, Joiners, Supervisors, and more. There are total 334 vacant positions are available in that recruitment. It is very reputed and prestigious organization in India. Those Interested and Eligible candidate can apply for this position. The mode to fill this application is in online mode. The respective candidate can fill their application form through the official website of ZP. The last date to fill this application form is 25th August 2023. ZP offers individual chance to contribute its mission in the field of Government. This presents an opportunity for qualified candidates to contribute their skills and expertise projects. For more details visit the official website of ZP at www.ibps.in.

महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती २०२३ : महाराष्ट्र जिल्हा परिषदेत गट-‘क’ यांमधील रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दिलेल्या जाहिरातींनुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये विविध प्रकारच्या जागेसाठी भरती सुरू करण्यात येत आहे. मिळालेल्या जाहिराती नुसार गट ‘क’ मध्ये हजारो रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हे अर्ज करण्यासाठीची अंतिम व शेवटची तारीख ही २५ ऑगस्ट २०२३ ही आहे. इच्छा असलेल्या व भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने २५ ऑगस्ट २०२३ च्या आधी आपले अर्ज योग्य रित्या भरायचे आहेत. हा अर्ज उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

Maharashtra Zilla Parihshad Recruitment

Maharashtra Zilla Parihshad Important Note For Exam

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये जवळ-जवळ एकाच वेळेस किंवा समान कलावधीत संगणकीकृत परीक्षा ही होणार आहे. तरीही या बाबत सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे, तसेच प्रत्येक उमेदवारांनी एकाच पदासाठी गरज नसतानाही अनावश्यक जास्त प्रमाणात जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करणे टाळावे. जर तरीही उमेदवाराने अनावश्यक अर्ज केले तर अर्ज शुल्कपोटी उमेदवाराचा मोठ्या प्रमाणात खर्च हा होऊ शकतो. त्याचबरोबर जर उमेदवाराने एकाच वेळी अनेक जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केले असतील, तर एकाच वेळी वेग-वेगळी परीक्षा देणे हे उमेदवारास अशक्य आहे, तरीही जर उमेदवाराने असे केले व त्यात काही चूक झाली किंवा उमेदवार परीक्षा देण्यात अपयशी ठरला तर त्याची जबाबदारी ही जिल्हा परिषद घेणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे.

Maharashtra Zilla Parihshad Vacancy 2023

  • पदांचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुषांकरिता), आरोग्य सेवक (महिलांकरिता), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
  • शिक्षणाची अट व पात्रता – शिक्षणाची अट व पात्रता ही पदनुसार आहे.
  • नोकरी करायची जागा व ठिकाण – महाराष्ट्र.
  • वयाची अट व मर्यादा – १८ ते ३८ वर्ष.
  • अर्ज करण्याची पद्धत – अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने IBPS द्वारे करायचा आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तरिख – ५ ऑगस्ट २०२३.
  • अर्ज भरण्याची अंतिम व शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२३.
  • खुल्या वर्गाकरिता परीक्षा शुल्क – रु. १०००/-
  • राखीव वर्गाकरिता परीक्षा शुल्क – रु. ९००/-
  • वेतन – रु. १९,९००/- ते रु. १,१२,४००/-

Who Could Apply For Maharashtra Zilla Parihshad 2023 Recruitment

जिल्हा परिषदेसाठी फक्त तेच उमेद्वार अर्ज करू शकतात जे महाराष्ट्राचे रहिवाशी आहेत. असे पात्र उमेद्वार आणि तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. मकसी १००७/ प्र.क्र.३६/का. ३६ दिनांक १० जुलै २००८ अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना अनुसूचित क्षेत्राबाहेरील उमेद्वार पदांसाठी अर्ज करू शकतात.

Important Dates ZP 2023 Recruitment

क्रमांकविवरणतारीख
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची तारीख५ ऑगस्ट २०२३
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठीची अंतिम व शेवटची तारीख२५ ऑगस्ट २०२३
ऑनलाइन पद्धतीने अर्जसाठीचा शुल्क भरण्यासाठीची अंतिम व शेवटची तारीख२५ ऑगस्ट २०२३
परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र म्हणजेच हॉल टिकिट उपलब्ध होण्याची तारीख परीक्षेच्या ७ दिवस आधी

Maharashtra Zilla Parihshad Education Qualification

  • शैक्षणिक पात्रता व अट ही रिक्त पदानुसार आहे, तरीही अधिक महितीसाठी उमेदवारांनी योग्य त्या संकेतस्थळी भेट देऊन जाणून घ्यावे.

Maharashtra ZP Required Age Criteria or Limit

  • महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक ०३ मार्च २०२३ निर्णयानुसार २५ एप्रिल २०१६ च्या महाराष्ट्र शासन निर्णयात विहित केलेल्या वयोमर्यादेत खुल्या वर्गासाठी ४० वर्षे तर मागासवर्गासाठी ४५ वर्षे देण्यात आली आहेत.
  • दि. ०३ मार्च २०२३ अन्वये शासन सेवेत नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे, तसेच देण्यात आलेली शिथिलता ही दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच लागू राहिल.
सर्वसाधारण व खुला वर्ग १८ वर्षे ते ४० वर्षे
मागास वर्ग१८ वर्षे ते ४५ वर्षे

Maharashtra ZP Online Application Fees

सर्वसाधारण व खुला वर्गरु. १०००/-
मागास प्रवर्गरु. ९००/-
माजी सैनिकमाजी सैनिकांसाठी अर्ज शुल्क नाही

Maharashtra ZP Required Application Documents

परीक्षेच्या निकालानंतर निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पडताळनीसाठी आवश्यक कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे. (निकलानंतर सादर करण्यात आलेली यादी ही तात्पुरती असेल)

  1. आवश्यक कागदपत्रे / आवश्यक प्रमाणपत्रे
  2. अर्जदाराने दिलेली माहिती ही बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी लागणारे स्वयंघोषंनापत्र
  3. शिक्षण पुरावा किंवा शैक्षणिक अर्हताचा पुरावा
  4. योग्य वयाचा पुरावा
  5. योग्य जन्म दिनांकचा पुरावा
  6. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्याचा पुरावा
  7. राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबधित जात प्रमाणपत्र किंवा नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  8. दिव्यांग असल्यास पात्र दिव्यांग व्यक्ति असल्याचा पुरावा
  9. माजी सैनिक असल्यास पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  10. खेळाडू असल्यास खेळाडू आरक्षणाकरिता लागणारा योग्य पुरावा प्रमाणपत्र
  11. महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र
  12. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतल्या प्रमाणे ८६५ गांवातील मराठी भाषा बोलणार्‍या उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला असणे आवश्यक
  13. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल केल्याचा पुरावा प्रमानपत्र
  14. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा प्रमाणपत्र
  15. पदवीधर किंवा पदवीधरक असल्यास त्याचा पुरावा
  16. MS-CIT केले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  17. टंकलेखन केले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  18. लघुलेखण केले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  19. अनुभव प्रमाणपत्र

How To Apply For Maharashtra Zilla Parihshad Vacancy 2023

  • सर्वात प्रथम IBPS या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाइट वर जा.
  • नंतर Create account पर्याय निवडून आपले अकाऊंट बनवून घ्या.
  • नंतर अकाऊंट लॉगिन करून “Apply Online” link for ZP Recruitment 2023 या वर क्लिक करा.
  • नंतर तुमच्या इच्छेनुसार पोस्ट / पद निवडा फॉर्म भरा.
  • स्कॅन केलेले कागदपत्र व प्रमाणपत्र अपलोड करा.
  • अर्ज साठी लागणारा योग्य तो शुल्क भरा.
  • शेवटी सगळा भरलेला फॉर्म एकदा तपासा आणि नंतर तुमचा फॉर्म सबमीत करून टाका.

कृपया ही उपयुक्त नोकरी बद्दल माहिती तुमच्या मित्र, परिवार व एखाद्या गरजू व्यक्ति पर्यंत अवश्य पोहचवा. अश्याच उपयुक्त व महत्वाच्या नोकरी बद्दल माहितीसाठी Nokarikatta.com या आपल्या साइटला रोज भेट द्या.
तसेच नवनविन अपडेटेस साठी आपल्या Whatsapp Group ला लवकरात लवकर जोईन करा.